नागपूरप्रमाणे मुलुंडमधील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणदेखील दाबण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न सुरू आहे. अपघातानंतर 16 तासांनी आरोपीला पकडणे, त्याची संशयास्पद वैद्यकीय तपासणी व तकलादू कलमे लावून नोंदविलेल्या गुन्ह्याबाबत नागरिकांमधून संशय व्यक्त केला जात आहे. भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांच्या दबावामुळेच पोलीस आरोपीविरोधात थातूरमातूर कारवाई करीत असल्याची चर्चा आहे.
नागपूर येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांचा मुलगा संकेत बावनपुळे याला ऑडी अपघात प्रकरणात वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. त्याचप्रमाणे मुलुंडच्या नवघर येथे शनिवारी झालेल्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणातील आरोपीला भाजपचे स्थानिक आमदार मिहीर कोटेचा वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याची मुलुंडकरांमध्ये जोरदार चर्चा आहे. इतकेच नाही तर एका महिलेकरवी आरोपीला पोलिसांच्या कोठडीत असतानाही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. पोलीस आरोपीविरोधात कठोर कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. यामुळे पोलिसांच्या कारभारावर मोठा संशय व्यक्त केला जात आहे.
7 सप्टेंबरच्या पहाटे 4 वाजता मुलुंड पूर्वच्या गव्हाणपाडा येथील आपृती टॉवर येथे प्रीतम थोरात, प्रसाद पाटील हे दोघे व्रॅप होर्डिंग शिडीवर चढून जाहिरीताचा गेट लावत असताना वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने त्यांना धडक दिली होती. त्यानंतर कारचालकाने त्यांना मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला होता. या अपघातात प्रीतम थोरात या तरुणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर प्रसाद पाटील याची प्रपृती चिंताजनक आहे. अपघात करून पळून गेलेला बीएमडब्ल्यू कार चालक आरोपी शक्ती अलग उैर्फ शॉन (33) याला नवघर पोलिसांनी 16 तासांनंतर नवी मुंबईतील एका तरुणीच्या घरातून पकडले.
नागरिकांचा सवाल
अपघातानंतर आरोपीने घराजवळ जाऊन बीएमडब्ल्यू पार्क केली. तेथून तो नवी मुंबईतील मैत्रिणीच्या घरी गेला. अपघाताच्या 16 तासांनंतर तेथून त्या आरोपीला पकडण्यात आले. त्या मैत्रिणीचा जबाब अद्याप का नोंदविलेला नाही? अपघातावेळी तीदेखील कारमध्ये होती का? पळून जाण्यात शक़्तीला कोणी मदत केली? असे सवाल उपस्थित होत आहेत.
संशय बळावला
शक्तीला अटक केल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीकरिता मुलुंडमधील अग्रवाल इस्पितळात नेण्याऐवजी राजावाडी इस्पितळात का नेण्यात आले?
तेथे त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. लघवीचे नमुने घेतले नसल्याचे समजते. म्हणजे इथेदेखील ससून इस्पितळासारखा प्रकार घडलाय का, रक्ताचे नमुने तरी त्याचेच घेतलेत का?
आरोपी शक्तीविरोधात दाखल गुन्ह्यात तकलादू कलम लावण्यात आलेत. मुळात हा गंभीर गुन्हा असल्याने बीएनएसचे कलम 106, 106 (2) हे लावले पाहिजे. पण तसे करण्यात आलेले नाही. पुराव्यात कच्चे दुवे सोडले? कोणाच्या सांगण्यावरून असे केले जातेय?
आरोपीच्या बापाची मुजोरी
अरे माझ्या मुलाकडून केवळ अपघात झालाय. त्याने कोणाची मर्डर केलेली नाही. त्यामुळे काही टेन्शनचे काम नाही. काही होत नाही बिनधास्त रहायचे, असे उद्धट वक्तव्य आरोपीच्या वडिलांनी केले. त्यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे. एका तरुणाचा जीव गेला तर दुसऱ्याची चिंताजनक अवस्था आहे. तरी स्थानिक आमदार आणि सरकारला त्याचे काहीच कसे पडलेले नाही? गृहखाते सपशेल फेल असून सरकार आपल्या लोकांना गुन्ह्यातून वाचविण्यासाठी ताकद लावतेय अशी टीका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.