उरणकरांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भाजप आमदार बालदींची भंबेरी

भाजप आमदार महेश बालदी यांच्या दुर्लक्षितपणामुळे मागील सहा वर्षांपासून रखडलेली आमसभा चांगलीच वादळी ठरली. रखडलेले १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, वाहतूककोंडी, पाणीप्रश्न, रस्त्यांची लागलेली वाट, मच्छीमारांचे होणारे नुकसान तसेच हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन यासह अन्य प्रश्नांवरून नागरिकांनी बालदी तसेच संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः फैलावर धरले. सहा वर्षांपासून आमसभा का घेतली नाही, उरणच्या विकासाचे तुम्हाला काही घेणेदेणे नाही का, असा रोकडा सवाल यावेळी काही जणांनी केला. त्यामुळे उत्तरे देताना आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.