मध्य प्रदेशात भाजपच्या एका मंत्र्याने महिलांना अजब सल्ला दिला. नवऱ्याला जर दारूचे व्यसन असेल तर त्यांना सांगा की, दारू घरी आणून प्या, असा अजब सल्ला मध्य प्रदेशातील सामाजिक न्याय मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी महिलांना दिला. भोपाळमधील आयोजित व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमात नारायण सिंह कुशवाह बोलत होते. तुम्हाला तुमच्या नवऱयाने दारू पिणे बंद करावे वाटत असेल तर त्यांना सांगा बाहेर पिऊ नका. घरी आणून प्या, असे ते म्हणाले.