लोकसभेच्या निवडणूक नंतर आता विधानसभेचे निवडणूक होणार असल्यामुळे महायुतीमध्ये चांगली रस्सीखेच नगर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. त्यातच नगर शहरामध्ये तर भाजपाने आता निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा सध्या पुढे येऊ लागली आहे. तर पराभूत झालेले भाजपचे खासदार सुजय विखे यांनी स्वतःच निवडणूक साठी उत्सुक आहे असे सांगत आता तालुका तालुक्यामध्ये मी उमेदवारी करायला तयार आहे असे सांगायला जाहीरपणे सुरुवात केली आहे. नगरमध्ये लवकरच एक दोन दिवसांमध्ये भाजप स्वतंत्र्य बैठक सुद्धा बोलवण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या आहेत.
नगर शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याचे कळल्यानंतर भाजपमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणूक लढवायची असे काही पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्या दृष्टिकोनातून त्यांनी आता एकत्रपणे येण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे.
या अगोदर भाजपला नगर शहरामध्ये कधी संधी मिळाली नव्हती, भाजपाचा या नगर शहरांमध्ये आमदार नसल्यामुळे आता नगर शहरांमध्ये भाजपाला जागा हवी असल्यामुळे त्यांनी त्या दृष्टिकोनातून आता मोट बांधायला सुरुवात केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आता ही जागा मिळाली पाहिजे अशी भावना आता काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे आता भाजपाने नगर शहरातील निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केल्या असल्यामुळे येथे एक दोन दिवसांमध्ये पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक सुद्धा आयोजित केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे भाजपाचे पराभूत लोकसभेचे उमेदवार सुजय विखे यांनी या अगोदर मी राहुरी मधून नंतर नेवासा मधून तर पारनेर मधून तर आता संगमनेर मधून मी निवडणूक लढवायला इच्छुक आहे असे म्हणत त्यांनी स्वतःहूनच आपण उमेदवारी करायला तयार आहोत असे म्हणत त्यांनी आता तालुका तालुक्यामध्ये सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांची आता मतदार खिल्ली उडवायला लागलेले आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागलेली आहे. एकंदरीत सुजय विखेंनी स्वतःहून गुडघ्याला बाशिंग बांधून विधानसभेची निवडणूक करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र ही एक प्रकारे चर्चा करणार आहे असे सुद्धा आता बोलले जात आहे.
तर दुसरीकडे कोपरगाव मतदार संघामध्ये आता भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आशुतोष काळे यांच्या विरोधामध्ये आता कोल्हे कशा पद्धतीने मोट बांधतात व निवडणूक कशा पद्धतीने करतात याकडे लक्ष लागलेले आहे. तिथे सुद्धा भाजपचा एक गट अस्वस्थ आहे, त्या तालुक्यामध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
पाथर्डी शेवगाव मतदार संघामध्ये पाहायला मिळत आहे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना थेट विरोध हा भाजपच्याच मंडळींनी या अगोदर केलेलं आहे त्यामुळे तिथे सुद्धा ऐन वेळेला बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ऐन वेळेला एक गट हा शेवटच्या टप्प्यामध्ये काय भूमिका घेतो हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. होण्याची शक्यता आहे त्यामुळे ऐन वेळेला एक गट हा शेवटच्या टप्प्यामध्ये काय भूमिका घेतो हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.