मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ती मुलाखत ‘पेड’

भारतीय जनता पक्षाकडून खासगी मीडियाला ताब्यात घेण्याचा प्रकार नवीन नाही. पण आता सरकारच्या अखत्यारीतील दूरदर्शनवरही सरकारचा दबाव वाढला आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलीकडेच झालेली मुलाखत. ती मुलाखत एखाद्या पत्रकाराकडून घ्यायला हवी होती. पण फडणवीसांची मुलाखत चक्क भारतीय जनता पक्षाचे मीडिया प्रमुख नवनाथ बन यांनी घेतली. त्यावरून टीका होऊ लागली आहे.

बन यांनी ही मुलाखत घेतली आणि त्यासाठी त्यांना दूरदर्शनकडून बिदागीही देण्यात आली. हे गुपित माहितीच्या अधिकारात उघड झाले. ती ‘पेड’ मुलाखत होती अशी टीका प्रशांत भूषण यांनी सोशल मीडियावर केली आहे. बन यांनी त्या मुलाखतीत फडणवीस यांना सोयीचे प्रश्न विचारले. त्यांनीच मुलाखत घ्यावी यासाठी सरकारकडून अगदी केंद्रातूनही दबाव आणल्याचे सांगितले जाते. भाजपचा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हा अत्याचार असल्याचेही बोलले जात आहे.