दिल्लीतील यमुना नदीत डुबकी मारून स्टंट करणे भाजप नेते वीरेंद्र सचदेवा यांना चांगलेच महागात पडले आहे. नदीच्या दूषित पाण्यात डुबकी मारल्यामुळे त्यांना इन्फेक्शन झाले. अंगाला खाज सुटली, त्वचेला इजा झाली तसेच श्वास घेण्यास अडचण आली. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तीन दिवसांसाठी औषधे दिली. दिवाळीनंतर साजरा होणाऱ्या छठ पूजेवरून दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात प्रदूषणावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यमुना नदी अस्वच्छ असल्याने दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत.