एकनाथ शिंदे मूर्ख, नालायक, बेरड मुख्यमंत्री; भाजपच्या पद्माकर वळवी यांचा हल्ला

धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्यावरून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी एकनाथ शिंदे हा मूर्ख, नालायक आणि बेरड मुख्यमंत्री आहे, असे म्हणत मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आदिवासी आमदार खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. सरकारला फक्त धमकी द्या. जो सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात निर्णय घेईल त्याला जमिनीत गाडल्याशिवाय शांत बसायचं नाही, असा आक्रमक प्रवित्रा पद्माकर वळवी यांनी आज घेतला.