
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आलं असलं तरी मंत्रीपदावरून अजूनही अनेकांमध्ये नाराजी आहे. बहुमताचं सरकार येऊन देखील महायुतीतील अनेक आमदार नाराज आहेत. भाजपने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या आमदारांना हवी तशी मंत्रीपदं त्यांना देता आलेली नाहीत. यामध्ये एक नाव आहे ते सुधीर मुनगंटीवार यांचं.
चंद्रपूर येथे फ्लाइंग क्लबचं आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. मंत्रीपद गेल्याचे दुःख सुधीर मुनगंटीवार विसरायला तयार नाहीत. हे दुःख त्यांनी परत एकदा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलं. ‘मेरी कुर्सी छिनी गई’, अशा शब्दात त्यांनी आपल्या मनातली सल सगळ्यांसमोर व्यक्त केली. मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
दरम्यान, राष्ट्रीय फ्लाइंग क्लब अध्यक्ष राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते येथील क्लबचे उद्घाटन करण्यात आलं.