भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

भाजप नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल टाइगर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचाराआधीच त्यांना मृत घोषित केले. ज्या कांके चौक येथे टाइगर यांची हत्या करण्यात आली त्याठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून एका हल्लेखोराला अटक केली आहे.