61 वर्षाच्या भाजप नेत्याने महिला पदाधिकारीसोबत बांधली लग्नगाठ

पश्चिम बंगालमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे शनिवारी भाजपाच्या पदाधिकारी रिंकू मजूमदार यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले. दिलीप घोष हे 61 वर्षांचे असून त्यांचे हे पहिलेच लग्न आहे तर रिंकू या 50 वर्षांच्या असून त्यांचे हे दुसरे लग्न आहे. रिंकू यांना पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.

रिकू मुजूमदार व दिलीप घोष हे 2021 पासून पक्षासाठी एकत्र काम करत आहेत. पक्षासाठी काम करत असतानाच ते मुजूमदार यांनी पुढाकार घेऊन घोष यांना लग्नाची मागणी घातली. घोष यांनी दोन महिन्यानंतर त्यांना लग्नासाठी होकार दिला. त्यांचे लग्न देखील अनोख्या पद्धतीने पार पडले. मुजूमदार यांनी घोष यांच्या घरी वरात नेले. ६ वाजता न्यू टाऊन येथील घोष यांच्या घरी मजूमदार वाजत गाजत पोहोचल्या.