भाजपची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. पण या यादीत अनेक कार्यकर्ते आणि निष्ठावान उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्यावरी झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.
पुण्यातील भाजपचे कार्यकर्ते धीरज घाटे यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे घाटे नाराज झाले आहेत. घाटे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तुम्हाला हिंदूत्ववादी सरकार हवंय, पण 30 वर्षे हिंदूत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय… अशा शब्दांत घाटे यांनी फेसबुकवर संताप व्यक्त केला आहे.
भाजपने तिकीट न दिल्याने अनेक नेते, कार्यकर्ते, आजी-माजी आमदार नाराज झाले आहेत. अनेकांनी बंडखोरी केली आहे तर काहींनी दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट मिळवले आहे.