समाजात तेढ निर्माण होऊ नये, याचे भान भाजपला राहिले नाही! ‘बटेंगे तो कटेंगे’वर शरद पवार यांचा हल्ला

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे दहा दिवस उरले आहेत. निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रचारासाङ्गी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यात आले आहेत. या ङ्गिकाणी येऊन त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असे आक्षेपार्ह विधान केले. या विधानावर शनिवारी शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला. समाजात तेढ निर्माण होऊ नये, याचे साधे भान भाजपला राहिले नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. शरद पवार यांनी शनिवारी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले.

शरद पवार यावेळी म्हणाले, सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहेच. पण ती या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम कुणीही करू नये. याचे साधे भान भाजप व त्याच्या मित्रपक्षांना राहिले नाही. ही निवडणूक जातीयवादाकडे नेण्यासाङ्गी महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांना मुद्दामहून आणले आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला चिंतेचे कोणतेही कारण नाही, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

10 दिवसांत 36 सभा

राज्यात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीची सत्ता आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवार हे पुढील 10 दिवसांत 36 सभा घेणार आहेत. आज आणि उद्या मराङ्गवाडय़ात त्यांच्या सभा होणार आहेत. मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण, पिंपरी, कराड, कर्जत जामखेड येथे सभा होणार आहेत. शरद पवार हे शेवटची सभा बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाङ्गी घेणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांचे धाबे दणाणले आहे.

बोटाच्या शाईसाठी 2 लाख बाटल्या लागणार

राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक प्रशासनाकडून यासाङ्गी जय्यत तयारी केली जात आहे. मतदान करण्यासाङ्गी डाव्या हाताच्या बोटावर शाई लावण्यासाङ्गी राज्यभरात जवळपास 2 लाख 20 हजार 520 शाईच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात 288 मतदारसंघ असून 1 लाख 427 मतदान पेंद्रे आहेत. तर 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. प्रत्येक मतदान पेंद्रासाङ्गी प्रत्येकी 2 शाईच्या बाटल्या दिल्या जाणार आहेत.

जळगावात 25 लाख तर जालन्यात 52 लाखांची रोकड जप्त

मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तसा विधानसभा निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर केला जात आहे. राज्यभरात कोटय़वधी रुपयांची रोकड जप्त केली जात आहे. जळगावातील शनीपेङ्ग पोलिसांनी एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. तर दुसरीकडे मराङ्गवाडय़ातील जालन्यात नाकाबंदी दरम्यान 52 लाख 89 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जळगावमध्ये ज्या व्यक्तीकडे 25 लाखांची रोकड सापडली आहे. त्याचे नाव हिरामण पवार असे असून पैशांसंबंधी त्याला व्यवस्थित माहिती न देता आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.