अजित पवार यांच्यासोबत आमची वैचारिक लढाई, सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

भाजप आमचा मुख्य राजकीय शत्रू आहेत, अजित पवार यांच्यासोबत आमची वैचारिक लढाई आहे असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच अजित पवारांना मत म्हणजे भाजपला मत असेही सुळे म्हणाल्या.

हिंदुस्तान टाईम्स या दैनिकाला मुलाखत देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्यात आमचे मुख्य राजकीय शत्रू हा भारतीय जनता पक्ष आहे. जर तुम्ही अजित पवार गटाला मत देता तर ते मत भाजपला जाणार. तसेच अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली अशी कबुली दिली होती. त्यावर सुळे म्हणाल्या की सुनेत्रा पवार यांना निवडणुकीसाठी उभं करणं हा राजकीय विचारसणीचा भाग होता की नाही हे माहित नाही. त्यामुळे अजित पवारांनी जी कबुली दिली ती कुठल्या संदर्भात दिली हे मला माहित नाही. जर ही कबुली कौटुंबिक दृष्टीकोनातून दिली असेल तर ते सार्वजनिक ठिकाणी का बोलले? ही बाब त्यांना कुटुंबीयांसोबतही बोलता आली असती असेही सुळे म्हणाल्या.

भाजपची विचारसरणी ही आता अजित पवारांची विचारसरणी झाली आहे. आमची विचारसरणी जुन्या काँग्रेस आणि डावी विचारसरणी आहे. त्यांची विचारसरणी ही संपूर्णपणे उजवी आहे. अजित पवार हे स्पष्टपणे हे संघ भाजपच्या विचासरणीसोबत आहेत असेही सुळे म्हणाल्या.