लोकसभा निवडणुकीत भाजपने वापरला इलेक्टोरल बॉण्डमधून मिळालेला पैसा, 4340 कोटी रुपयांची मिळाली होती देणगी

लोकसभा निवडणुकीत भाजप मलामाल झाला होता. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला 4 हजार 340.47 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थने याबाबत एक अहवाल जारी केला आहे. भाजपनंतर काँग्रेसला 1 हजार 225.12 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ADR च्या अहवालानुसार पक्षांना इलेक्टोरल बॉण्डमधून सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत.

 

भाजपने एकूण देणगीपैकी 2 हजार 2211.69 म्हणजेत 51 टक्के देणगी खर्च केला आहे. तर काँग्रेसने एकूण देणगीपैकी 1025.25 कोटी म्हणजेच 83.69 टक्के खर्च केला आहे. आम आदमी पक्षाला 22.68 कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले आहेत पण त्यांनी या वर्षात 34.09 कोटी रुपये खर्च केले आहेत.

सर्व पक्षांना जेवढी देणगी मिळाली आहे त्यापैकी 74.57 टक्के देणगी एकट्या भाजपला मिळाली आहे. उर्वरित पक्षांना 25.43 टक्के देणगी मिळाली आहे.

राजकीय पक्षांना बहुतांश देणगी ही इलेक्ट्रोरल बॉण्डमधून मिळाली असून हे इलेक्ट्रोरल बॉण्ड गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले होते. इलेक्ट्रोरल बॉण्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी भाजपला म्हणजेच 1685.63 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.