विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले असून भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. असे असले तरी अजूनही भाजपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भीती आहे. उद्धव ठाकरे यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत यश मिळेल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे भाजप मिंधेंच्या नाकदुऱ्या काढत आहे.
हिंदुस्तान टाईम्सने याबाब वृत्त दिले आहे. जास्तीत जास्त मंत्रिपद मिळावे म्हणून एकनाथ शिंदे यांनी भाजपवर दबाव टाकला होता. एका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. एकनाथ शिंदे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईत 10 जागा मिळाल्या आहेत. भाजपला एवढ्या जागा मिळूनही मुंबईत उद्धव ठाकरे यांनी भाजपला अस्मान दाखवलं. आता काही महिन्यांवर महानगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. उद्धव ठाकरे यांना मुंबईत विधानसभा निवडणुकीत जे यश मिळाले आहे ते यश मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही मिळेल, अशी भाजपला भीती आहे. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे यांच्या नाकदुऱ्या काढत आहे.