भाजपच्या माजी आमदारानं केला राडा; अपक्ष आमदाराच्या कार्यालयाबाहेर गोळीबार

उत्तराखंडमधील हरिद्वारच्या खानपूर येथील अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार देखील करण्यात आला. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी उत्तराखंडचे माजी आमदार आणि भाजप नेते कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यावर कारवाई झाली आहे. अपक्ष आमदाराच्या घराबाहेर कुंवर सिंह प्रणव चॅम्पियन यांनी त्यांच्या समर्थकांसह गोळीबार केल्याचा आरोप आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काही दिवसांपासून जोरदार वादावादी सुरू होता. एकमेकांना धमक्या देणे आणि शिवीगाळ करण्याचे प्रकारही सुरू होते. रविवारी, कुंवर सिंह आणि त्यांचे समर्थक तीन वाहनांमधून खानपूर येथील उमेश कुमार यांच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली आणि अंदाधुंद गोळीबार केला असं सांगण्यात येत आहे.