दिल्लीत भाजपकडून मतदार यादीत घोळ, आप खासदार संजय सिंह यांचा आरोप

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप लावले आहेत. भाजपचे मंत्री आणि खासदार मतदार यादीत घोळ घालून निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धुळ फेकत असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.

सिंह म्हणाले की प्रवेश वर्मा हे माजी खासदार आहे. तरी मे पासून जानेवारीपर्यंत 8 महिन्यांपासून खासदारांच्या बंगल्यावर कब्जा केला आहे. वर्मा यांनी यांच बंगल्यावर 33 मतदारांचे नाव टाकण्याचा अर्ज दिला आहे.

दुसरीकडे भाजप खासदार सीपी जोशी यांनी 14 विंडसर प्लेस नवी दिल्ली या पत्त्यावर 28 मतदारांची नावं टाकण्यासाठी अर्ज दिल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. भाजपकडून गोल मार्केट पोस्ट ऑफिसजवळ 44 मतदार, व्हीपी हाऊसच्या एका घरावर 24 मतदार, मीना बागमध्ये 24, महादेव मार्गावरील खासदार निवासातून 22 आणि नवरंग हाऊसच्या छोट्याशा पत्त्यावर 23 मतदारांची नावं टाकण्याचा अर्ज देण्यात आला आहे.

भाजप मतदार यादीत घोळ घालत असल्याचा आरोप खासदार सिंह यांनी केला होता. या घोटाळ्यात भाजपचे केंद्रीय मंत्री आणि खासदार यांचा समावेश असून भाजप निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धूळ फेकत आहे असेही सिंह म्हणाले.