भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रातील भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. या प्रकरणी श्वेता महाले या चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार आहेत.

श्वेता महाले यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. तर महाले यांचे पती विद्याधर महाले हे प्रशासकीय खात्यात उच्चपदावर आहेत. श्वेता महाले यांना धमकीचे पत्र आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. श्वेता महाले यांना कुठल्या कारणावरून धमकी देण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही. या पत्रात श्वेता महाले यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. पण, हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवलं, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाहीय.