अजित पवार, मिंधेंच्या गटात भाजपची घुसखोरी; अनेक मतदारसंघांत चेलेचपाट्यांना केले उभे

विधानसभा निवडणुकीत महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. मित्रपक्षाचा केसाने गळा कापणाऱ्या भाजपने या विधानसभा निवडणुकीतही मित्रपक्षाचा केसाने गळा कापण्याचे काम केले आहे. महायुतीतील जागा वाटपात सर्वाधिक जागा आपल्या वाटय़ाला घेतल्या असून भाजपने याव्यतिरिक्त आपले 19 नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि मिंधेंच्या गटात पाठवले आहेत. निवडणुकीच्या वाटाघाटीत भाजपाने धूर्त खेळी खेळली आहे. विधानसभेतील जागा तुमची, परंतु माणसे आमची असा फॉर्म्युला भाजपने वापरला आहे. त्यांचे अनेक चेलेचपाटे आता तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. भाजपचे हे चेलेचपाटे आता कमळाच्या चिन्हाऐवजी घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत.

कोणत्या मतदारसंघांचा समावेश

अर्जुनी मोरगाव, बाळापूर, कन्नड, परभणी, धाराशीव, लोहा कंधार, नवापूर, संगमनेर, नेवासा, करमाळा, इस्लामपूर, फलटण-कोरेगाव, तासगाव-कवठेमहाकाळ, कुडाळ-मालवण, पालघर, अंधेरी पूर्व, भिवंडी पूर्व, बोईसर, मुंबादेवी.