भाजप खासदारांच्या घरातून 30 ते 40 नवीन मतदारांसाठी अर्ज येत आहे असा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला होता. हा खुलासा अतिशय धक्कादायक असून भाजप फक्त बेईमानी करते अशी टीका आपचे नेत अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच भाजपने दिल्लीत हार स्वीकारली आहे अशी टीकाही केजरीवाल यांनी केली.
आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले की, संजय सिंह यांनी जो खुलासा केला आहे. तो खुप धक्कादायक आहे. शिवीगाळ करणाऱ्या पक्षाचे अनेक मंत्री आणि खासदारांच्या घरातून 30-40 नवीन मतदारांचे अर्ज डिसेंबर आणि जानेवारीत करण्यात आले आहेत. हे लोक कोण आहेत? आणि शिवीगाळ करणाऱ्या भाजपच्या खासदारांच्या घरात कसे आले? एक खोली असलेल्या झोपडीतूनच 30 नवीन मतदारांचे अर्ज आले आहेत. एका छोट्या दुकानातून 40 नवीन मतदारांचे अर्ज आले आहेत हे लोक कोण आहेत? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.
तसेच भारतीय जनता पक्षाने हार स्वीकारली आहे. भाजप फक्त बेईमानी करते हे आता जनतेसमोरही आले आहे. आमचे कार्यकर्ते इतके सतर्क होते की आम्ही भाजपची सर्व बेईमानी आम्ही पकडली आहे असेही केजरीवाल म्हणाले.