
कर्नाटकात सरकारी पंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्ष भाजपने कडाडून विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात सोमवारपासून 16 दिवस आंदोलन करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
‘लोकांची चळवळ’ या शिर्षकाखाली राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन चार टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हैसूर येथून जनआक्रोश यात्रेला सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर मंडया, हसन, कोडागु, मंगळुरू, उडीपी, चिक्कमंगळुरू, शिवमोगा आणि उत्तर प्रदेश जिह्यात आंदोलन होईल. दुसऱ्या टप्प्यात बेळगाव, हुबळी, बागलकोट, कलबुर्गी, विजयपुरा आणि बिदर, तिसऱ्या टप्प्यात दवांगेरे, हावेरेपासून तुमकुरूपर्यंत तर चौथ्या टप्प्यात बंगळुरू ग्रामीण, किक्कबल्लापुरा ते रामनगरापर्यंत आंदोलन करण्यात येईल.