भाजपन कायम मित्रपक्षाला दगा देत आलीय हे आता नित्याचेच झाले आहे. राज्यसभेत कायम भाजपला साथ देणाऱ्या भाजपने लोकसभा निवडणूकीआधी ओडीशात बिजू जनता दलात देखील फोडाफोडी केली. त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या तब्येतीविषयी अनेक खोट्या गोष्टी पसरवल्या. त्याचा बिजू जनता दलाला फटका बसला व ओडीशात भाजपची सत्ता आली. तेव्हापासून बिजू जनता दलाने भाजपसोबत फारकत घेतली असून बुधवारी राज्यसभेत इंडिया आघाडीच्या खासदारांसोबत बिजू जनता दलाच्या नऊ खासदारांनी देखील सभात्याग केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा अभिनंदन प्रस्तावावर बोलत होते. सुरुवातीला विरोधक शांतपणे भाषण ऐकत होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या असताना त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. ”या लोकांना सरकार फक्त ऑटो पायलट मोडवर किंवा रिमोट मोडवर ठेवून चालवता येते. त्यांचा काम करण्यावर विश्वास नाही”, अशी टीका केली. त्या टीकेवर विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जु खर्गे यांनी आक्षेप घेत आपल्याला बोलू देण्याची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांच्याकडे केली. मात्र धनकड यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभात्याग केल्यानंतर त्यांच्यासोबत बिजू जनता दलाच्या खासदारांनी देखील सभात्याग केला.