हिंदुस्थानात व्हेज तसेच नॉनव्हेज खाणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि चवीचे पदार्थ खवय्यांना आवडतात. त्यामुळे देशातील गल्लोगल्लीत खाद्य पदार्थांची दुकाने पहायला मिळतात. आणि आजकाल घरी बसल्या एक फोनवरून ऑर्डर देऊन खाद्यपदार्थांचा आनंद लुटता येतो.
तसेच 2024 मध्ये स्वीगीने दिलेल्या अहवालानुसार या वर्षी बिर्याणीच्या प्रत्येक मिनिटाला 158 ऑर्डर मिळाल्याचे सांगितले. त्यामध्ये सर्वाधिक हैदराबादी चिकन बिर्याणीला लोकांची पसंती मिळाली आहे. 2024 च्या बिर्याणी लिडरबोर्डमध्ये हैदराबादने 9.7 दशलक्ष चिकन बिर्याणी ऑर्डर घेऊन पहिला नंबर मिळवला आहे. त्यामध्ये रमझानच्या दिवशी 6 दशलक्ष बिर्याणी ऑर्डर हैदराबादमधून आल्याची माहिती अहवालात दिली आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने वर्षाच्या शेवटी एक रिपोर्ट जारी केला आहे. त्या रिपोर्टमध्ये 1 जानेवारी ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत गोळा केलेल्या डेटानुसार सर्वाधिक नॉनव्हेज बिर्याणी ऑर्डर केल्याचे नमूद केले आहे.