
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे नोकऱ्या धोक्यात येतील असा सूर सध्या सगळीकडे उमटत आहे. यावर अखेर मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनीही नुकतेच आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, कोडर्स, शास्त्रज्ञ आणि ऊर्जा तज्ञ या तीन विभागातील नोकऱ्यांना एआयचा धोका राहणार नाही, असे बिल गेट्स यांचे म्हणणे आहे. कोडिंगच्या या प्रक्रियेत माणसांची भूमिका महत्त्वाची आहे त्यामुळे एआय त्यांची जागा घेऊ शकणार नाही. एआय जीव शास्त्रज्ञांची जागा घेऊ शकणार नाही, कारण या कामात एआय वैज्ञानिक शोधांसाठी सर्जनशीलता दाखवू शकणार नाही. तसेच एआय ऊर्जा तज्ञांची जागा घेणार नाही कारण हे क्षेत्र अजूनही पूर्णपणे स्वयंचलित होण्यासाठी खूप गुंतागुंतीचे आहे, असे ते म्हणाले.