Video – टायरचे बेसिन अन् स्कूटरचा सोफा! बाईकप्रेमीचे अनोखे घर होतंय व्हायरल

मनासारखं घर असावं, असं प्रत्येकाला वाटते. आपले घर स्वच्छ, सुंदर दिसावे म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. अशाच पद्धतीने एका बाईक आणि कारप्रेमीने हटके पद्धतीने आपले घर सजवलंय. सोशल मीडियावर हे अनोखे घर व्हायरल होतंय. सोशल मीडिया इन्फ्युएन्सर प्रियमने नुकतीच केरळमधील एका बाईकवेड्याच्या घराला भेट दिली. बाईकप्रेमीने आपल्या स्वप्नातील घर साकारले आहे. त्याने घराची सजावट करण्यासाठी मोटारसायकलचे पाट्स वापरून घराचा कोपरान कोपरा सजवलाय. घराबाहेरच लेटरबॉक्स, लिव्हिंग रुम, किचन अशा प्रत्येक जागी बाईकचे पार्ट कलात्मकरित्या बसवले आहेत. उदाहरणार्थ, बाईकचा टँक वापरून मेलबॉक्स तयार केलाय.

इंजिन माऊटचा वापर करून लिव्हिंग रुममध्ये स्टायलिश टेबल बनवलंय. एका स्कूटरचे तर चक्क सोफ्यात रुपांतर केलंय. झुंबर म्हणून सायकलची चौकट टांगलेय. दारातील दिवे म्हणून स्कूटरचे हेडलाईट भिंतीला बसवलेत. नट बोल्ट आणि स्पॅनरसारख्या स्पेअर पार्टचा वापर करून कीचनमध्ये डायनिंग टेबल बनवलाय. टायरचे वॉश बेसिन, टॉवेल ठेवण्यासाठी स्टीअरिंग व्हिलचा कल्पकतेने उपयोग केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyam Saraswat (@priyamsaraswat)