
गुगलची मुलाखतीची अत्यंत खडतर प्रक्रिया पूर्ण करण्याची किमया बिहारमधील लहानशा गावातील तरुणाने करून दाखवली आहे. प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करून त्याने गुगलची मुलाखत क्रॅक करून दाखवली. त्याला गुगलमध्ये नोकरी मिळाली असून तब्बल 2 कोटींचे पॅकेज मिळाले आहे. बिहारमधील जुमई जिह्यातील अभिषेक कुमार या अभियंत्याने हे डोळे दिपवणारे यश मिळवले असून ऑक्टोबरमध्ये त्याच्या या नव्या कारकिर्दीला सुरुवात होणार आहे.
अभिषेक जुमई जिह्यातील जामु खरिया गावात राहतो. त्याचे वडील इंद्रदेव यादव हे जमई दिवाणी न्यायालयात वकील आहेत, तर आई मंजूदेवी गृहिणी आहेत. अभिषेकच्या घरी शिक्षणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले गेले हेच आपल्या यशाचे श्रेय असल्याचे अभिषेक अभिमानाने सांगतो.