कल्याणमध्ये परप्रांतीय अभिषेक शुक्ला याने एका मराठी कुटुंबावर हल्ला केल्याचे प्रकरण घडले. आता मुंबईत एका मराठी कर्मचाऱ्याचा छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित मराठी कर्मचाऱ्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर शिवसैनिकांनी कंपनीत धाव घेतली. आणि संबंधित बिहारी मॅनेजरला समज देत दणका दिला.
मुंबईतील एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. एक बिहारी सब पे भारी, असे म्हणत मराठी कर्मचाऱ्याला त्रास दिला, असा आरोप मराठी कर्मचाऱ्याने केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी कंपनीत जावून या प्रकरणी मॅनेजरला समज दिली.
दक्षिण मुंबईतील एक खासगी कंपनी आहे. त्या खासगी कंपनीत एक मराठी कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून काम करतोय. गेल्या सहा महिन्यांपासून बिहारी मॅनेजर आहेत त्यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास दिला जतोय, छळ करण्यात येतोय. एका पत्राद्वारे पीडित कर्मचाऱ्याने कंपनी व्यावस्थापनाकडे तक्रार केली आहे. एक बिहारी सब पे भारी, असं वारंवार मॅनेजर आपल्याला ऐकवतो, असे पीडित मराठी कर्मचाऱ्याने पत्रात म्हटले आहे.
पीडित मराठी कर्मचाऱ्याने कंपनीकडे तक्रार केली. त्यासोबतच शिवसेनेकडेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तक्रार केली. त्यानंतर शिवसेनेचे स्थानिक विभागप्रमुख संतोष शिंदे आणि शिवसैनिक या कंपनीत गेले. आणि त्यांनी बिहारी मॅनेजरकडून हा प्रकार समजून घेतला आणि त्याला समज दिली आहे.