बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांनी जेडीयू – भाजप सरकारविरोधात पाटणा येथे आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांचा आवाज दाबत पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली आहे. यावरूनच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संपात व्यक्त करत जेडीयू – भाजप सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी लाठीमारचा एक व्हिडीओ शेअर करत ‘एक्स’वर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ”मी संसदेत म्हटले होते की, ज्याप्रमाणे एकलव्याचा अंगठा कापला जातो, त्याचप्रमाणे पेपर लीक करून तरुणांचा अंगठा कापला जातो. याचे ताजे उदाहरण म्हणजे बिहार. बीपीएससीचे उमेदवार पेपर फुटीच्या विरोधात आवाज उठवत आहेत आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत.”
बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार आपले अपयश लपवण्यासाठी विद्यार्थ्यांवर लाठीमार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह असल्याचे राहुल गांधी म्हणाले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ, असंही ते म्हणाले.
मैंने संसद में कहा था कि जिस तरह एकलव्य का अंगूठा कटवाया गया था उसी तरह पेपर लीक करवाकर युवाओं का अंगूठा काटा जाता है।
इसका ताज़ा उदाहरण बिहार है। BPSC अभ्यार्थी पेपर लीक के ख़िलाफ़ आवाज़ उठा रहे हैं और एग्जाम को रद्द करने की मांग कर रहे हैं।
लेकिन NDA की सरकार अपनी नाकामी को… pic.twitter.com/tJLFzT7GPh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 26, 2024