Bihar News – बिहारी बाबूच्या प्रेमात पडली अमेरिकन मॅडम

विदेशी तरुणीला देशी नवरदेव आवडला आणि ती चक्क विवाहासाठी हिंदुस्थानात पोचली. बिहारच्या छपरा येथे हा विशेष लग्नसोहळा रंगला. नवरदेव आणि अमेरिकन वधू या लग्नसोहळ्याला अमेरिकन वऱ्हाडी मंडळी घेऊन आली आणि एका लग्नाची चर्चा रंगली. 33 वर्षीय आनंद कुमार सिंह यांचा अमेरिकेत हॉटेल व्यवसाय आहे. त्या दरम्यान त्यांची साफिया सेंगर हिच्याशी भेट झाली. एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 16 जानेवारी रोजी साफिया अमेरिकन मित्रांसोबत चंदउपुर गावात पोचली. 20 जानेवारी रोजी आनंद आणि साफिया दोघांनी हिंदू परंपरेने लग्न केले.