बिहारच्या मुजफ्फरपूर येथूने रेल्वे पोलिसांनी एका हॉटेलमधून चार जणांना अटक केली असून, ही मंडळी मागील दोन वर्षांपासून रेल्वेच्या बनावट तिकिटांची विक्री करत होती. कमी अंतराच्या जनरल तिकिटांमध्ये हेराफेरी करुन त्यांची विक्री करुन पैसे उकळले जायचे. पोलिसांनी 45 जनरल तिकीटे, 125 स्टॅम्प आणि इतर काही वस्तू जप्त केल्या आहेत. पाटणा, मुजफ्फरपूर, दरभंगा आणि समस्तीपूर येथे ही टोळी सक्रिय होती.
कमी पल्ल्याचे अर्थात 10 रुपयांची तिकीटे खरेदी करुन त्यामध्ये खोडाखोड केली जात. संबंधित तिकीट लांब पल्ल्याचे असल्याचे सांगून 30 रुपयांपर्यंत विकले जायचे. यासाठी स्थळ, किलोमीटर याबाबत हेराफेरी केली जायची. याप्रकरणी उमेश साहनी, दशरथ साहनी, संतोष साह आणि बिगू राम यांना अटक करण्यात आली आहे.