मर्सिडिजची लाच, महिलांवर नोटांची उधळपट्टी; बिहारच्या आयएएस अधिकाऱ्याचा कारनामा

बिहारच्या एका आयएएस अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. तसेच तो लाच म्हणून महागड्या गाड्यांची मागणी करत असे तसेच महिलांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करायचा. संजीव हंस असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. ईडीने दीड कोटी रुपयांचे सोने, 87 लाख रुपयांची रोकड आणि 11 लाख रुपयांची चांदी जप्त केली. आता ईडीनुसार, बिहारच्या विशेष देखरेख युनिटने आयएएस अधिकारी संजीव हंस आणि झांझारपूरचे माजी आमदार गुलाब यादव यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

बलात्काराचा आरोप

एका महिलेने संजीव हंस आणि माजी आमदार गुलाब यादव यांच्यावरही सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता. ही केस आता सुप्रीम कोर्टात आहे. एफआयआरमधून दिसून आलेय की, संजीव हंस महिलेसोबतचे संबंध लपवण्यासाठी महिलेला दरमहा दोन लाख रुपये खर्च देत असे.