
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राष्ट्रगीताचा अवमान केला. एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना ते लोकांना हात हलवून अभिवादन करत राहिले. ते पाहून प्रधान सचिव दीपक कुमार यांनी नितीश कुमार यांना टोकण्याचा प्रयत्न केला. त्यांना राष्ट्रगीत सुरू असल्याची आठवण करून दिली. तसेच सावधान स्थितीत उभे राहण्याचा इशाराही केला. पण, त्यांनी अजिबात ऐकले नाही आणि पत्रकारांकडे पाहत त्यांना अभिवादन करत राहिले. यावरून संताप व्यक्त होत आहे.
सुरुवातीला नितीश कुमार यांनी राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ते थांबवले. आधी आपण स्टेडियमभोवती एक फेरी मारूया आणि मग तुम्ही राष्ट्रगीत सुरू करू शकता असे नितीश कुमार म्हणाले. काही वेळाने ते स्टेजवर परतले. राष्ट्रगीत पुन्हा सुरू झाले. परंतु, ते सुरू असताना नितीश कुमार हातवारे करत राहिले. दरम्यान, तुम्ही एका मोठय़ा राज्याचे मुख्यमंत्री आहात हे विसरू नका. अशाप्रकारे वारंवार बिहारला अपमानित करू नका, असे तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना सुनावले.