बिहारमधील विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढणार; भाजपने फासे टाकण्यास केली सुरुवात

 

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही. NDA मधील घटकपक्ष JDU आणि TDP या पक्षांच्या टेकुवर सरकार स्थापन होईल. मात्र नितीश कुमार यांचा पलटी मारण्याचा स्वभाव सर्वश्रुत असल्याने भाजपने आतापासून फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी घोषणा भाजपने केली. तसेच केंद्रातही नितीश कुमार यांच्या पक्षाला चांगली खाती मिळण्याची शक्यता आहे.

बिहार भाजपचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी मोठी घोषणा केली. 2025 मधील विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढली जाईल. 1995 पासून आम्ही नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवत आहोत, असे विजय कुमार सिन्हा यांनी म्हंटले.