‘बिग बॉस मराठी’च्या घरातील राडे काही थांबायच नाव घेत नाहीयेत. दरम्यान तिसऱ्या आठवड्याचा प्रोमो रिलीज झाला असून आठवड्याची सुरुवातच निक्कीच्या कल्ल्याने झालेली पाहायला मिळाली. निक्कीने घराची कॅप्टन अंकिता वालावलकर धक्काबुक्की केली. तर, पंढरीनाथ कांबळे ‘पॅडी’ वर अरेरावी करताना दिसली आहे. त्यामुळे बिग बॉस घरात नव्या वादाला तोंड फुटले असून या आठवड्यात नक्की काय होणार याकडे साऱ्यांच लक्ष लागल आहे.
View this post on Instagram
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘बिग बॉसच्या घरात निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून आली. हा वाद निक्कीच्या कपड्यांमुळे झाला आहे. निक्कीने पॅडीला माझ्या वस्तुंना का हात लावला?” असा प्रश्न केला. त्यावर पॅडी म्हणाल,”माझी ड्युटी करतोय. यावर निक्कीचा राग अनावर झाला आणि तिने घरात राडा घातला. निक्कीने पॅडीच्या कपड्यांची फेकाफेकी केरताना दिसली.
निक्कीच्या या अरेरावीवर घराची कॅप्टन ‘कोकणहार्टेड गर्ल’ अंकिता आक्षेप घेतला. तुझ्या आवाजाला इथे सगळ्यांनी घाबरुन राहायचं का इथे”असे ती निक्कीला म्हणाली. त्यावर निक्की ‘हो’ असं उत्तर दिलं. त्यानंतर निक्की अंकिताची धक्काबुक्की झालेलं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.