अभिनेत्री ईशा सिंग 15 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात? रागीट स्वभावामुळे पहिल्या पत्नीसोबत झालेला घटस्फोट

‘बिग बॉस’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना आवडण्याची खूप कारणे आहेत. त्यात एक महत्त्वाचे कारण म्हणजे सलमान खानचा वीकेंड का वार. आठवड्याभरात घडलेल्या घडामोडींवर सलमान या दोन दिवसांमध्ये परखडपणे आपली मते मांडतो. चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करतो तर चुकीचे वागणाऱ्यांचे कान टोचतो. असाच काहीसा प्रकार शनिवारच्या वीकेंड का वार मध्ये घडला. विकेंडच्या वारमध्ये सलमानने ईशाला शालीन भनोटसोबतच्या नात्यावर थेट प्रश्न विचारला. त्यावर ईशा खुलासा करताना दिसत आहे.

विकेंडच्या वारमध्ये सलमानने ईशाला शालीन भनोटचे नाव छेडले. सलमानने ईशाला विचारले, शो मध्ये येण्यापूर्वी तू शेवटचा फोन कोणाला केला होता. यावेळी सलमानने शालीनबाबत इशारा करत म्हणाला की, बॉयफ्रेण्ड नसेल तर क्लोज फ्रेण्ड असेल असे म्हणत कदाचित मी त्याला ओळखत असेन असेही म्हटले. स्वभावात तो शालीन असेल असा इशारा केला. ईशाला सलमानचा रोख शालीनकडे असल्याचे लक्षात आल्यावर ती लाजली. त्यानंतर तिने शालीनसोबतचे तिचे नाते स्पष्ट केले आणि सांगितले की तिचे आणि शालीनमध्ये कोणतेही प्रेमसंबंध नाहीत.ती म्हणाली शालीन फक्त माझा चांगला मित्र आहे.आम्ही एकत्र काम केले आहे म्हणून आम्ही एकमेकांशी खूप चांगला बॉण्ड शेअर करतो. याशिवाय आमच्यात काहीही नाही. शालीन आणि माझी घट्ट मैत्री आहे. मी त्याचा खूप आदर करते. एवढेच आहे. त्यानंतर करणवीर मेहरानेही ईशाच्या शालिनसोबतच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. करणवीर मेहरा म्हणाला होता की, ‘खतरों के खिलाडी’ शो दरम्यान शालिन नेहमी ईशासोबत व्हिडिओ कॉलवर असायचा. मात्र, ईशाने हे मान्य करण्यास नकार दिला.

शालीन आणि ईशाबद्दल बोलायचे झाले तर दोघांनी ‘बेकाबू’ या शोमध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा आहे. मात्र, बिग बॉसमध्ये ईशा अविनाशसोबत लव्ह अँगल करताना दिसली होती. अशा परिस्थितीत सलमानने नेमकी परिस्थिती विचारली. शालीनबद्दल बोलायचे तर तो घटस्फोटित आहे. शालीनचे पहिले लग्न अभिनेत्री दलजीत कौरसोबत झाले होते. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. शालीनला एक मुलगाही आहे.शालीन आणि ईशाच्या वयात 15 वर्षांचे अंतर आहे.