‘हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, ठिकाना भी हम तय करेंगे और वह वक्त भी!’ नेतान्याहू यांचा इराणला इशारा

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ‘क्षेपणास्त्र हल्ला करून इराणने मोठी चूक केली आहे. इराणला याची किंमत चुकवावी लागेल’, असा इशारा नेतान्याहू यांनी दिला आहे. यामुळे इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता पेटला असून मध्य पूर्वेत आता युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

लेबनॉनमध्ये सुरु असलेल्या कारवाईसंबंधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणला मध्ये न पडण्याचा इशारा दिला होता. परंतु, इराणने त्याकडे दुर्लक्ष करत मंगळवारी रात्री तब्बल 400 क्षेपणास्त्रे डागली. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थाननेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

तेल अवीवमधील हिंदुस्थानी दूतावासाने इस्रायलमधील आपल्या देशातील नागरिकांसाठी एक सूचना जारी केला आहे. ॲडव्हायझरीमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना सतर्क राहण्यास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.

अनावश्यक प्रवास टाळा! इराणच्या घातक हल्ल्यानंतर इस्रायलमधील आपल्या नागरिकांसाठी हिंदुस्थानच्या सूचना जारी