अॅपलचा फेस्टिव्ह सीजन सुरू झाला आहे. हा सेल 3 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सेलमध्ये अॅपलच्या प्रोडक्ट्सवर दहा हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. अॅपलच्या एम3 बेस्ड मॅकबुक एअर आणि नुकताच लॉन्च झालेल्या आयफोन 16 सीरिजवर शानदार डिस्काऊंट दिला जात आहे. या सेलमध्ये अॅपलच्या प्रोडक्ट्सवर दहा हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. अॅपलच्या मॅक व डेस्कटॉपवर दहा हजार रुपये, तर लेटेस्ट आयफोन 16 वर पाच हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. 24 इंचांच्या आयमॅक डेस्कटॉपवरसुद्धा दहा हजार रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काऊंट ऑफर केला जात आहे. आयफोनचे प्रोडक्ट्स खरेदी करताना ग्राहकांनी जर अमेरिकन एक्स्प्रेस, ऑक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्डस्चा वापर केला तर त्यांना हा डिस्काऊंट मिळणार आहे. या सर्व फेस्टिव्ह ऑफर ऑनलाइन आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहेत.