‘बिग बॉस मराठी-5’ चा विजेता जाहीर होण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. गुलीगत फेम सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. विजेत्याला ट्रॉफीसह 25 लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर या घराबाहेर पडल्या आहेत. याआधी अरबाज पटेल, पंढरीनाथ कांबळे (पॅडी) घराबाहेर पडले होते. ‘बिग बॉस’ला नवा विजेता मिळणार असून यासाठी आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला चाहत्यांची उत्कंठा वाढत आहे.