
आधुनिकीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली जंगले नष्ट झाली, झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळू लागले. आपण आपल्या पुढल्या पिढीसाठी काय ठेवून जाणार आहोत, एक सुजाण नागरिक म्हणून आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखता ‘भोईवाड्याचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या वर्षी ‘एक हात निसर्गासाठी’ हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत गणेशोत्सव मंडळ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फुल, हार, नारळऐवजी किंवा त्यासोबत कमीत कमी एक वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असलेले झाड वृक्ष लागवडीसाठी घेऊन यावे, असे आवाहन मंडळातर्फे भाविकांना करण्यात आले आहे. भाविकांनी दिलेल्या झाडाचे मंडळातर्फे रोपण करण्यात येणार आहे.