ट्रॅफिक पोलिसांच्या वर्दीवर बॉडीवॉर्न कॅमेरे; चिरीमिरीला बसणार चाप, चालकांच्या सोबतच्या वादाचे सत्यही बाहेर येणार

हेल्मेट नसणे किंवा बेशिस्त वाहतूक करणाऱ्या चालकांना हटकल्यानंतर अनेकदा पोलीस आणि वाहनचालकांमध्ये वादाची ठिणगी पडते. त्यातच अनेक चालक व्हिडीओ शूट करून पोलिसांच्या अरेरावीवरही आवाज उठवतात. मात्र आता कोण खरे आणि खोटे हे एका झटक्यात कळणार आहे. यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाचे अधिकारी व अंमलदारांना 20 बॉडीवॉर्न कॅमेरे दिले असून काही दिवसात आणखी 200 बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांचे वाटप करणार आहेत. हे कॅमेरे पोलिसांच्या वर्दीवर किंवा कमरेला लावणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच पोलिसांमधील वाद कॅमेऱ्यात कैद होईल. त्याशिवाय चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांवरही हे कॅमेआमॉचय के डिजिटला युगात वाहतूक पोलिसांना अधिक प्रभावीपणे आपले कर्तव्य बजावता यावे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदारांना बॉडीवॉर्न कॅमेरा देण्यास सुरुवात केली आहे. बॉडीवॉर्न कॅमेरा ही एक वेअरेबल ऑडीओ-व्हिडीओ किंवा फोटोग्राफिक रेकॉर्डिंग सिस्टीम असून या उपकरणाच्या माध्यमातून वाहतूक पोलीस एकमेकांशी सहजपणे जोडले जाणार आहेत. वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदारांना घटनास्थळावरील घटना व्हिडीओ, ऑडीओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरता येणार आहे. हे कॅमेरे वाहतूक पोलीस कर्तव्य करीत असताना त्यांच्या छातीवर, खांद्यावर किंवा कमरेला लावण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच पोलिसांमधील वाद कॅमेऱ्यात कैद होईल.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांचे लोकेशन या कॅमेऱ्यातून समजणार आहे. तसेच ट्रॅफिक जंक्शन, महामार्ग किंवा इतर संवेदनशील ठिकाणांवरील लाईव्ह घटना रेकॉर्ड करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे, असे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.