भाऊ ओवाळणीसाठी येतोय यासाठी बहीण आतुरतेने वाट बघत होती. मात्र बहिणीचा चेहरा बघण्याआधीच काळाने भावावर डाव साधला. भावाचा अपघात झाला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. भाऊबीजच्या दिवशी सदर घटना घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भाऊबीजेच्या दिवशीच भावाचा प्रेमाला बहीण पोरकी झाली. ही दुदैवी घटना पोंभुर्णा तालुक्यात घडली. अक्षय निलकंठ वाढई (25)असे मृत भावाचे नाव असून तो पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील आहे. डोंगर हळदी गावा जवळ असलेल्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हळविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.