1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 2 हजार 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ कागदावरच राहिली, अशा शब्दांत शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी आज सरकारवर हल्लाबोल विधानसभेत केली.
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावेळी भास्कर जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला. देशात आपले राज्य हे 13 व्या क्रमांकावर आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे आपल्या राज्यातील उद्योग गुजरात, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेशात जात आहेत. आमच्या ताटातला घास इतर राज्य पळवीत आहेत. राज्याचा विकास साधायचा असेल तर येथे उद्योग आणायला हवे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली.