भरूच टोलनाका सर्वाधिक कमाईचा! 10 टोलनाक्यांतून सरकारने कमावले 14 हजार कोटी

देशात रस्ते, महामार्गाचे जाळे पसरत चालले आहे. त्यामुळे टोल प्लाझामध्ये होणारी कमाई वाढत आहे. सरकारने संसदेत टोल करातून होणाऱ्या कमाईचे आकडे सादर केले. देशातील 10 टोलनाक्यांतून सरकारने अवघ्या पाच वर्षांत तब्बल 13,988.51 कोटी रुपये कमावले आहेत. त्यानुसार गुजरातच्या भरुच येथील टोल प्लाझा हा सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा आहे.

दिल्ली-मुंबई हायवेवरील टोल प्लाझा हादेखील कमाईमध्ये अव्वल आहे. याशिवाय जीटी रोडवरील टोल प्लाझातून जास्त कमाई होते. या टोलनाक्यांवर पाच वर्षांत एक हजार कोटींहून अधिक कमाई झालेली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 472.65 कोटी रुपयांची कमाई झाली. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा शाहजहांपूर टोल प्लाझा आहे, जो दिल्लीला मुंबईशी जोडणाऱ्या एनएच 48 च्या गुडगाव-कोटपुतली-जयपूर पट्टय़ात आहे. या टोल प्लाझावरून मागील पाच वर्षांमध्ये 1884 कोटी रुपये कर प्राप्त झाला आहे.

देशातील आघाडीचे टॉप दहा टोल प्लाझा

  • भर्थाना (गुजरात) – 2,043.81 कोटी
  • शाहजहांपूर (राजस्थान) – 1,884.46 कोटी
  • जलधुलागोरी (पश्चिम बंगाल) – 1,538.91 कोटी
  • बराजोड (उत्तर प्रदेश) – 1,480.75 कोटी
  • घरौंडा (हरियाणा) – 1,314.37 कोटी
  • चोरयासी (गुजरात) – 1,272.57 कोटी
  • ठीकरिया/जयपुर प्लाजा (राजस्थान) – 1,161.19 कोटी
  • एल ऍण्ड टी कृष्णागिरी थोपुर (तामिळनाडू)   – 1,124.18 करोड़ रुपये
  • नवाबगंज (उत्तर प्रदेश)- 1,096.91 कोटी
  • सासाराम (बिहार) – 1,071.36 कोटी