भारत जोडो विवाह वेडिंग कार्ड व्हायरल

सोशल मीडियावर एका लग्नाची पत्रिका प्रचंड व्हायरल झाली आहे. या लग्न पत्रिकेला भारत जोडो विवाह असे नाव दिले आहे. ही पत्रिका म्हणजे विविधतेत एकता आहे. या लग्न पत्रिकेचे डिझाईन, रंग आणि पॅटर्न काँग्रेस पार्टीच्या भारत जोडो यात्रेशी प्रेरणा घेऊन करण्यात आले आहे. या डिझाईनमध्ये काँग्रेस पार्टीच्या पोस्टरसारखा लुक देण्यात आला. हे केवळ लग्न नाही तर सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे.