महायुतीत अखेर खातेवाटप झाले आहे. अनेकांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भरत गोगावले यांनाही अखेर मंत्रीपद मिळालं आहे. मात्र, आता रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातच फरत गोगावले यांनी रायगडहून मुंबईकडे हेलिकॉप्टरने प्रवास केला आहे. मंत्रीपद मिळताच त्यांची उड्डाणं सुरू झाली आहेत. त्यांच्या या हेलिकॉप्टर प्रवासामागे पालकमंत्रीपदासाठी शक्तीप्रदर्शन आहे काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तसेच सोशल मिडीयावरही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नेटकरी त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.
रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून अजित गट विरुद्ध शिंदे सेना असा वाद रंगण्याची शक्यता पालकमंत्री आपल्याच गटाचा व्हावा यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हट्ट आहे. आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंच्या समर्थकांकडून भावी पालकमंत्रीचे बॅनर झळकवण्यात आलेत. त्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांच्या हेलिकॉप्टर प्रवासाकडे बघितले जात आहे.
अखेर भरत गोगावलेंच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. त्यानंतर त्यांची उड्डाणेही सुरू झाली आहेत. त्यांच्या हेलिकॉप्टरने रायगडवरून उड्डाण भरले आणि मुंबईच्या दिशेने ते आले. आमच्या साहेबांनी शब्द खरा केला, अशा फुशारक्या त्यांचे समर्थक करत आहेत. महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भरत गोगावले यांना मंत्रिपदापासून सातत्याने हुलकावणी मिळत होती. मात्र, यंदा अखेर मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. राज्यात आणि रायगडमध्ये जनतेचे अनेक प्रश्न आहेत