सानिकाचे ‘अरंगेत्रम’

भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स अँड कल्चरलची विद्यार्थीनी आणि केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा, प्रसिद्ध गुरु डॉ. संध्या पुरेचा यांची शिष्या सानिका शिंदे हिचे भरतनाटय़म शैलीतील  ‘अरंगेत्रम’ 7 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान होणार आहे.

सानिका कथ्थक नृत्य प्रकारातही निपुण आहे. ती भरतनाटय़ममधील एम. ए. चे शिक्षण घेत आहे. आजपर्यंत तिने खजुराहो महोत्सव, कालिदास महोत्सव, वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली कला सादर केली आहे. टिव्ही मालिकांमध्येही तिने अभिनय केला आहे.  ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि राज्य सेवा हक्क आयोगाचे अधिकारी दिलीप शिंदे आणि अभिनेत्री रुपलक्ष्मी शिंदे यांची ती कन्या आहे. डॉ. संध्या पुरेचा यांच्या शिष्यांचे हे 51 वे ‘अरंगेत्रम’ कार्यक्रम असून रसिकांसाठी तो विनामूल्य आहे.