
मुंबईतल्या भांडूप भागात एका अल्पवयीन तरुणाने तलवारीने बसवर हल्ला केला आहे. या तरुणाने आधी बस चालकाला धमक्या दिल्या. त्यानंतर बसच्या काचा फोडल्या. या प्रकरणी पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
भांडूपच्या मिनीलँड भागात एक तरुण तलवार घेऊन बससमोर उभा राहिला. त्याने आधी चालकाला धमक्या दिल्या. त्यानंतर या तरुणाने तलवारीने बसच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. यामुळे बसचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांना माहिती मिळताच्या त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.