Bhandara: वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील गावाचा संपर्क तुटला

>> सूरज बागड, भंडारा

भंडारा जिल्ह्यात मागिल मागिल चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बावनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बपेरा येथिल पुलावर चार फूट पाणी असुन महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला आहे. तर वैनगंगा नदीने देखिल धोका पातळी ओलांडली आहे. भंडारा जवळील कारधा छोट्या पुलावर देखील पाणी असल्याने हा पूल बंद करण्यात आला आहे. तर गोसेखुर्द धरनाचे 33 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.