भंडाऱ्यात तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वेगाडीखाली येऊन तरुणाने आत्महत्या केली. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील हसारा टोली परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक भोंडेकर असे मृत तरुणाचे नाव असून तो हसारा टोली या गावात राहणारा होता. दीपक सकाळी कुणालाही न सांगता घरून बाहेर पडला होता. त्याने तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावरील धावत्या रेल्वेगाडीखाली स्वतःला झोकून दिले. यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद तुमसर रेल्वे पोलिसांनी घेतली असून तुमसर पोलीस तपास करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.