
ऑर्डिनन्स फॅक्टरीत 24 जानेवारी रोजी झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील मशीन आणि विविध उपकरणांच्या देखभालीत निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. एका अधिकाऱयाने याबाबत माहिती दिली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.